Ad will apear here
Next
मला मिळालेला कार्यसिद्धी पुरस्कार पूरग्रस्तांना समर्पित : गायक नंदेश उमप


ठाणे :
‘एखादा पुरस्कार स्वीकारणे म्हणजे मोठी जबाबदारी असते. मला मिळालेला कार्यसिद्धी पुरस्कार मी राज्यातील पूरग्रस्तांना समर्पित करीत आहे,’ अशा शब्दांत गायक, संगीतकार नंदेश उमप यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

अस्मी स्टुडिओ व एट के मल्टिमीडिया यांच्यातर्फे आयोजित रंग मल्हार कार्यक्रमाच्या वेळी नंदेश उमप यांना त्यांच्या संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल कार्यसिद्धी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. खासदार राजन विचारे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. ठाण्यातील सहयोग मंदिरमध्ये हा कार्यक्रम झाला. या वेळी ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे, टिप टॉप हॉलचे रोहितभाई, अस्मी स्टुडिओच्या रूपाली तेलवणे, संदीप तेलवणे आदी उपस्थित होते. 

पुरस्काराला उत्तर देताना नंदेश उमप म्हणाले, ‘आपल्याला आपल्या कार्याबद्दल मिळालेला पुरस्कार हा नवीन उभारी देणारा असतो, त्याबरोबर जबाबदारीची जाणीव करून देणारा असतो. सुरांच्या सागरात मी वडिलांमुळे पोहायला शिकलो. या सागरात एकदा शिरलो, की नवीन सूर गवसत जातात.’ 

पावसाच्या साक्षीने रंगलेल्या रंग मल्हार कार्यक्रमात बासरीवादक विवेक सोनार यांनी मल्हार रागासह विविध राग बासरीवर वाजवून रसिकांची दाद मिळवली. त्यांना अनुतोष दिघारिया यांनी तबल्यावर साथ दिली. दुसऱ्या सत्रात पंडित राम देशपांडे यांच्या सुश्राव्य गायनाने रसिक आनंदात न्हाऊन निघाले. त्यांना यती भागवत यांनी तबल्याची, तर अनंत जोशी यांनी हार्मोनियमची साथ दिली. श्रेयसी मंत्रवादी यानी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/GZURCD
Similar Posts
कल्याण-डोंबिवली परिसरातील पर्यटनस्थळे ‘करू या देशाटन’ या सदराच्या गेल्या भागात आपण ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर, अंबरनाथ आदी परिसरातील पर्यटनस्थळे पाहिली. आजच्या भागात पाहू या कल्याण-डोंबिवली परिसरातील पर्यटनस्थळे...
‘आमिषाला बळी न पडता लोकाभिमुख काम करणे हे सरकारी कर्मचाऱ्यांचे कर्तव्य’ ठाणे : ‘तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करून सरकारी कामांमध्ये पारदर्शकता ठेवून अधिकारी-कर्मचाऱ्यांनी शासकीय सेवांचा लाभ नागरिकांना जलद गतीने देण्यासाठी प्रयत्न करावेत. शासकीय सेवकांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता लोकाभिमुख काम करण्याचे कर्तव्य पार पाडावे. आपण जनतेचे सेवक असल्याची भावना कायम मनात दृढ ठेवून
‘आधुनिकतेने हिरावले संस्कार’ ठाणे : ‘माणसांनी तांत्रिक बाबींमध्ये प्रगती केली खरी; पण त्याचसोबत गेल्या काही वर्षांपासून आलेल्या आधुनिकतेने आपल्यातील संस्कार हिरावले आहेत. व्हॉट्सअॅप, फेसबुकसारख्या सोशल मीडियामुळे देशाचे भविष्यनिर्माते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तरुण पिढीसह आपल्याही संवेदना, गांभीर्य कमी होत आहे,’ अशी खंत ‘तारक मेहता
भारतीय मजदूर संघाचा ठाणे जिल्हा मेळावा उत्साहात ठाणे : भारतीय मजदूर संघाच्या ठाणे जिल्ह्याचा मेळावा डोंबिवली येथील कानविंदे व्यायाम शाळेच्या सभागृहात नुकताच उत्साहात झाला. या मेळाव्याला भारतीय मजदूर संघाचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री रवींद्र देशपांडे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language